चिखलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक वार

1295

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या मांडणाचा राग मनात धरुन तीघा टोळक्यांनी मिळूण फिल्मी स्टाईल प्रमाणे एका तरुणाची कार भर रस्त्यात अडवून त्याच्यावर कोयत्याने आणि रॉडने प्राणघातक वार केले. ही घटना शनिवारी (दि.१४) दुपारी साडेबाराच्या सुमारास चिखलीतील घरकुल सोसायटी समोरील स्पाईन रोडवर घडली.

बाळासाहेब अंकुश कोंडलकर (वय ३०, रा. नागेश्वर हायस्कुल जवळ, पाटीलनगर, चिखली) असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलिस ठाण्यात मनोज खंडागळेसह त्याच्या दोन साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळासाहेब आणि आरोपी मनोज या दोघांचे किरकोळ कारणावरुन गुरुवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी मनोज आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांनी मिळून शनिवारी (दि.१५) दुपारी साडेबाराच्या सुमारास चिखलीतील घरकुल सोसायटी समोरुन आपल्या कारने घरी चाललेल्या बाळासाहेब यांच्या कारच्या आडवी कार लावली. तसेच मनोज आणि त्यांच्या दोन साथीदारांनी बाळासाहेब यांनी कारच्या खाली खेचून कोयत्याने आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या घटनेत बाळासाहेब गंभीर जखमी झाले. निगडी पोलिसांनी त्यानुसार मनोज खंडागळे आणि त्याचे इतर दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे आरोपींचा तपास करत आहेत.