चिखलीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

1086

चिखली, दि. ७ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चौघाजणांच्या टोळक्यांनी एका तरुणावर दगड आणि दांडक्याने जीवघेणा हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना चिखली येथे बुधवारी (दि.५) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

सुजित शंकर म्हस्के (वय २३, रा. भावेश्र्वरी हौसिंग सोसायटी, के.जे.चावला शाळेच्या समोर मोरेवस्ती, चिखली) असे मारहाण होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर बजरंग साबळे (वय २१, रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, चिखली) यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार किरण खुडे, सोन्या ढवळे आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी  किरण खुडे, सोन्या ढवळे आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांनी मिळून बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सुजित याला दगड आणि लाकडी दांडक्याने डोक्यावर जबर मारहाण केली. यामध्ये सुजित गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी किरण, सोन्या आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलिस ठाण्याचे सहाय्याक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करत आहेत.