चिखलीत पीएमपी बस प्रवासादरम्यान महिलेची सोन्याची पाटली चोरीला

117

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – पीएमपी बस प्रवासा दरम्यान एका महिलेच्या हातातील ४० हजार रूपये किमतीची सोन्याची पाटली चोरट्याने चोरली. ही घटना भेकराईनगर ते चिंचवड या दरम्यान घडली.

याप्रकरणी नलनी ज्ञानदेव सपकाळ (वय ५७, रा. तुकाई दर्शक, फुरसुंगी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.६) सकाळी दहा वाजता नलनी या भेकराईनगर येथून चिंचवडला जाण्यासाठी पीएमपी बसमध्ये बसल्या होत्या. या प्रवासादरम्यान त्याच्या डाव्या हातातील ४० हजार रूपयांची सोन्याची पाटली चोरट्याने हातचलाखीने चोरुन नेली. चिखली पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.