चिखलीत पादचारी महिलेच्या गळ्यातील सव्वालाखांचे सोने चोरट्यांनी केले लंपास

133

चिखली, दि. १५ (पीसीबी) – रस्त्याने पायी चाललेल्या एका महिलेच्या गळ्यातील ५१ ग्रॅम वजनी सोन्याचे गंठण आणि चेन असा १ लाख ३० हजारांचा ऐवज दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसका मारुन चोरुन नेला. ही घटना मंगळवार (दि.१४) रात्री नऊच्या सुमारास जाधववाडी ते कुदळवाडी दरम्यान घडली.

याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी ४० वर्षीय महिला या पायी जाधववाडी ते कुदळवाडी रस्त्यावरुन जात होत्या. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ५१ ग्रॅम वजनी सोन्याचे गंठण आणि चेन असा १ लाख ३० हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक फुगे चोरट्यांचा शोध घेत आहेत.