चिखलीत पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

376

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – पत्नीला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पती आणि इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि.२) सकाळी अकराच्या सुमारास विवाहीतेने चिखलीतील सोनवणे वस्तीतील शाईनसिटी सी/६०५  येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

दिपाली प्रदीप अहिरे (वय २७, रा. चिखली, सोनवणे वस्ती, शाईनसिटी सी/६०५) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा भाऊ संदीप जाधव (वय ३१, रा. म्हात्रे आळी, पश्चिम ठाणे) यांनी पतीसह अण्य तिघांविरोधात निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रदीप बळीराम अहिरे आणि अण्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण दिपाली हीचे प्रदीप अहिरे यांच्या सोबत २००६ साली विवाह झाला होता. दिपाली ही पती प्रदीप सोबत चिखली येथील सोनवणे वस्तीतील त्यांच्या घरी राहत होती. विवाह झाल्या पासून पती प्रदीप आणि परिवारातील इतर तिघेजण दिपालीच्या चारित्र्यावर संशय घेवून तीचा शारीरीक आणि मानसिक छळ करत होते, तसेच तिला वारंवार टोचून बोलून माहेरहून पैसे आणण्यास दबाव आणत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे कंटाळलेल्या दिपालीने राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अद्याप कोणालीही अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलिस तपास करत आहेत.