चिखलीत टेम्पो रिव्हर्स घेताना चिरडल्याने ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू

168

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – टेम्पो रिव्हर्स घेताना चाका खाली येऊन चिरडल्याने एका ४६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.२५) दुपारी तीनच्या सुमारास चिखलीतील रिव्हर रेसिडेन्सी समोरील मोकळ्या जागेत घडली.

विरेंन्द्र पुनवासी गौंड (वय ४६, रा. चिखली) असे टेम्पो खाली चिरडून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालक आप्पा किसन मोटे (वय ३६, रा. मोरेवस्ती, चिखली) याच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र किरवे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास मृत विरेंन्द्र हा चिखलीतील रिव्हर रेसिडेन्सी समोरील मोकळ्या जागेत झोपला होता. यावेळी आप्पा हा त्यांच्या ताब्यातील टेम्पो रिव्हर्स घेत होता. त्यावेळी टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने विरेंन्द्र चिरडलागेला आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आप्पा विरोधात निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आप्पा याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलिस तपास करत आहेत.