चिखलीत जबरदस्तीने कारमध्ये बसवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

943

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – पायी घरी निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून चार जणांच्या टोळक्यांनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चिखलीतील घरकुल येथे सोमवारी (दि.२३) रात्री आठच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पिडीत १५ वर्षीय मुलीने निगडी पोलिस ठाण्यात सुमित मोहोळ उर्फ आक्या बॉण्ड आणि अज्ञात तिघांविरोधात निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्री आठच्या सुमारास चिखली येथील घरकुल परिसरातून पायी आपल्या घरी निघाली होती. यावेळी तेथे उभे असलेला आरोपी सुमित आणि त्याच्या तिघा मित्रांनी मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिचा विनयभंग केला. पिडीतेने याबाबत निगडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.