चिखलीत चिमुकल्याच्या गळ्यातील सोन्याचे बदाम चोरट्याने हिसकावले

139

भोसरी, दि. ८ (पीसीबी) – आई-वडिलांसोबत भाजी खरेदीसाठी गेलेल्या एका चिमुकल्याच्या गळ्यातील ९ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनी सोन्याचे बदाम हिसका मारुन चोरुन नेले. ही घटना रविवारी (दि.७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिखली कृष्णानगर येथील भाजी मंडईमध्ये घडली.

याप्रकरणी दिव्या रंजन मोहंती (वय ३४, रा. सोनीग्रा हाईट्स सोसायटी प्लॉट क३. ए ६, टॉवर लाईन त्रिवेणीनगर, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर नावाच्या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी दिव्या या पती आणि मुलगा कबीर सोबत चिखली कृष्णानगर येथील भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी सागर नावाच्या चोरट्याने कबीर याच्या गळ्यातील ९ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनी सोन्याचे बदाम हिसका मारुन चोरुन नेले. चिखली पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.