चिखलीत खून केल्याच्या रागातून आरोपीच्या घरावर दगडफेक करून तोडफोड

228

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – किरकोळ कारणातून मित्राकडून मित्राचा खून झाला. या रागातून खून झालेल्या मित्राच्या नातेवाईकांनी संशयित आरोपीच्या घरावर दगडफेक करून घरातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी (दि.१७) सकाळी साडेनऊच्या सुमारास चिखलीतील शरदनगर येथे घडली.

या प्रकरणी विठ्ठल लक्ष्मण मोरे (वय ७० रा. शरदनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल यांचा नातू प्रतीक ऊर्फ मोन्या मोरे यांने सनी घाटोळकर याचा खून केला. यावरून सनी याच्या नातेवाईकांनी विठ्ठल यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच विठ्ठल यांच्या घरातील फ्रीज आणि इतर साहित्यांची तोडफोड केली. अधिक तपास चिखली पोलीस  करत आहेत.