चिखलीत कोयत्याचा धाक दाखवून तरुणाचे अपहरण करुन मारहाण

394

भोसरी, दि. ८ (पीसीबी) –  तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून अपहरण करत पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि. ६) दुपारी तीनच्या सुमारास मोरेवस्ती चिखली आणि रामनगर चिंचवड येथे घडली.

सचिन बापू सोनवणे (वय २०, रा. चिखली) असे अपहरण होऊन मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.  याप्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अस्लम मुजावर, आकाश शिनगारे, तुषार भंडारी, योगेश लहाने, पवन लष्करे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मोरेवस्ती मधील साई मंदिराजवळ  उभा होता. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या पाच आरोपींनी सचिनला कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीवरुन चिंचवड मधील रामनगर येथे असलेल्या दाट झाडांमध्ये सचिनला घेऊन गेले. तेथे त्याला जबर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलीस तपास करत आहेत.