चिखलीतून सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक

177

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगाराला पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह चिखलीतील मोरेवस्तीतून आटक करण्यात आली आहे.  ही कारवाई निगडी पोलिसांनी सोमवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास केली.

सागर ऊर्फ एसपी आनुरथ पोटभरे (वय २९, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी निगडी पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक सराईत गुन्हेगार पिस्तुल घेऊन चिखलीतील मोरेवस्ती येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निगडी पोलिसांनी सापळा रचून सागर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सागर विरोधात निगडी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.