चिखलीतील महापालिका शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

135

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – चिखली,  नेवाळे वस्ती येथे बेटी बचाव-बेटी बचाव च्या संयोजिका जयश्री गाडे‌ यांनी गुरुपौर्णिमा उत्सव महापालिका शाळेत मुलींसोबत व शिक्षकांसोबत साजरी केली.  मुख्यधापिका   उबाळे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला .

जयश्री गाडे म्हणाल्या  की, बेटी पढाव अभियानात मुलींचे शिक्षण हे फक्त शिक्षकांनी घेतलेल्या   परिश्रमामुळेच शक्य आहे. मुली नेहमीच निकालात आघाडीवर असतात. कारण शिक्षक मुलींमध्ये व मुलांमध्ये भेदभाव करत नाही. गुरु म्हणून त्यांचा सन्मान करणे गरजेचेच आहे. बेटी बचावच्या विविध योजनांची यावेळी माहिती देण्यात आली.