चिखलीतील पायी कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

184

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – चिखलीतील बजरंग दल आणि कुदळवाडीतील प्रखंड व्यापारी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवाराचे औचित्य साधुन कुदळवाडीतील श्री भैरवनाथ महाराज मंदिर येथून घोराडेश्वर मंदिराकडे आज (सोमवारी) सकाळी आठच्या सुमारास पायी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत मोठ्य संखेने भाविकांनी गर्दी केली होती.  

यावेळी नगरसेवक दिनेश यादव, बाळासाहेब मोरे, अनिल गुप्ता, अमरचंद गुप्ता, दत्तात्रय यादव, नाना बालघरे, शैलेश त्रिपाठी, मनोज गुप्ता, बबलु गुप्ता, आदी सहभागी झाले होते.

सकाळी निघालेली पायी यात्रा इद्रायणी नदीवर कावड मध्ये गंगा जल भरुन  त्या ठिकाणी गंगा जलचे सामुहिक पुजन करण्यात आले. त्यानंतर चिखली, तळवडे, देहु येथून दुपारच्या विसाव्याला किन्हई गावातील शनिमंदिरा जवळ आली. विसाव्याच्या ठिकाणी महाप्रसाद घेऊन यात्रा देहुरोड मार्गे घोराडेश्वर डोंगरावर कावड यात्रा समाप्त झाली.