#चिंताजनक | पुण्यात कोंढवा, नाना पेठ, सिंहगड रोडवर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले

109

पुणे,दि.६(पीसीबी) – कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुणे शहरात सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण हे सहकारनगर, मंगळवार पेठ, नाना पेठ, सिंहगड रोड, कोंढवा या भागात आढळले आहेत.

आतापर्यंत पुण्यासह पिंपरी चिंचवड भागात कोरोनाबाधितांचा आकडा १०० वर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईसह पुण्यालाही कोरोनाने विळखा घालायला सुरुवात केली आहे. एकट्या पुणे शहरात ७४ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.

तसेच राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७८० वर पोहोचली आहे.

WhatsAppShare