चिंचवड स्टेशन येथे सव्वा लाखाची घरफोडी

46

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – चिंचवड स्टेशन परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 18 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना 29 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता चिंचवड स्टेशन येथील कुणाल प्लाझा येथे उघडकीस आली.

ओमश्री बाबू हिरेमठकर (वय 30, रा. कुणाल प्लाझा, चिंचवड स्टेशन) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिरेमठकर यांचे घर 25 जून रोजी दुपारी दोन ते 29 जून रोजी सायंकाळी साडेसात या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून 75 हजारांचे सोन्याचे गंठण, 15 हजारांचे कानातील टॉप्स, 20 हजारांच्या अंगठ्या आणि साडेआठ हजारांची रोख रक्कम असा एकूण एक लाख 18 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare