चिंचवड स्टेशन येथे वाहनांची तोडफोड केल्या प्रकरणी सराईत गुन्हेगार सुरज वाघमारेला तीन दिवसांची कोठडी

260

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – चिंचवड येथे प्रवासी वाहनांची तोडफोड केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार सुरज उर्फ ससा वाघमारे (वय २६, रा. आनंदनगर, चिंचवड) आणि त्याचा साथीदार साजिद चांद मुलाणी (वय २३, रा. वाल्हेकरवाडी) या दोघांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.१८ जुलै) भरदिवसा आरोपी सुरज आणि त्याचा साथीदार साजिद या दोघांनी प्रवासी भरु न दिल्याच्या रागातून चिंचवड स्टेशन येथे उभ्या असलेल्या तिन प्रवासी वाहनांची तोडफोड केली होती. पिंपरी पोलिस ठाण्यासमोर हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. पिंपरी पोलिसांनी दोघांनाही अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता सुरजला तीन तर साजिद याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.