चिंचवड स्टेशन परिसरातून अल्पवयीन सराईताकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त

967

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – अवैधरित्या पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी चिंचवड स्टेशन परिसारतून एका १७ वर्षीय अल्पवयीन सराईताला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याचे तपास पथक पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना त्यांना त्यांच्या खबऱ्याकडून देहुरोड परिसरातील एक सराईत फरार आरोपी चिंचवड रेल्वेस्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून १७ वर्षीय अल्पवयीन सराईत आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकेड एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करुन आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.