चिंचवड लोहमार्ग पोलिसांनी वाचवले मुलीचे प्राण

174

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – रेल्वे पूर्णपणे थांबण्यापूर्वीच उलट्या दिशेने उतरल्याने अपघात झालेल्या १५ वर्षीय मुलीला लोहमार्ग पोलिसांनी सुखरुप वाचवले. ही घटना आज (गुरुवार) चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली.

शेख रोजी शहाउद्दीन (वय १५, रा. कुदळवाडी, चिखली) असे वाचवण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास लोणावळ्याहू सुटणारी लोकल (९९८०९) चिंचवड रेल्वे स्थानकावर आली होती. या लोकमधून शेख परिवार प्रवास करत होते. त्यांना चिंचवड येथे उतरायचे होते. या गडबडीत लोकल थांबण्यापूर्वी रोजीने लोकलच्या वेगाविरुद्ध उतरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिचा तोल जाऊन ती लोकल आणि प्लॅटफॉर्म यांच्या मध्ये पडली. हे दृष्य दिसताच लोहमार्ग पोलिसांनी तिला वरती खेचले आणि तिचे प्राण वाचवले. ही कामगिरी पोलीस नाईक अनिल बागुल, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम वाळेकर, रेल्वे पोलीस फोर्सचे जवान चंद्रकांत गोफणे यांनी केली.