चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ भरदिवसा तीन वाहनांची तोडफोड

49

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ भरदिवसा तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना आज (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथे असलेल्या दवाई बाजारजवळ घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज बुधवार सायंकाळी सहाच्या सुमारास चिंचवड रेल्वे स्टेशन येथील काही खाजगी वाहनचालकांमध्ये पॅसेंजर बसवण्यावरुन वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि काही टोळक्यांनी तीन वाहनांची तोडफोड केली. दरम्यान पिंपरी पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने नुकसान झालेल्या वाहनचालकांनी संताप व्यकत केला आहे.