चिंचवड येथे पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने रक्षाबंधन उत्साहात साजरा

115

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवडगाव येथील पोलीस ठाण्यात पोलिस आज (रविवारी) बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

यावेळी चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग विश्वजित खुळे, चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव पाटील, एपीआय उमेश लोंढे, विठ्ठल मदने, प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे,  प्रदेश कार्याध्यक्ष गोपाल बिरारी, सुभाष मालुसरे, युवराज चिंचवडे, शुभम चिंचवडे, ओमकार भोसले, अनुज शहा, रोहित भालके, अनिता जगताप, श्वेता सोनावणे, प्राची थोरात, स्नेहा पंचमुख तसेच संपूर्ण पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पोलिसांची ही कर्तव्य भावना आहे, सर्वसामान्य नागरिकांचे सण उत्साही वातावरणात साजरे व्हावेत, यासाठी पोलीस आपले कर्तव्य बजावत असल्याचे मत संस्थापक प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी व्यक्त केले.