चिंचवड येथे कोयत्याचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटले

182

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – ट्रकमध्ये माल भरुन सहकाऱ्यासोबत जात असताना अज्ञात तीन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांची दुचाकी ट्रकच्या आडवी लावून कोयत्याचा धाक दाखवत ट्रक चालक आणि त्याच्या सहकाऱ्या जवळील रोख १६ हजार रुपये जबरदस्ती चोरुन नेले. ही घटना बुधवार (दि.१३) रात्री पावणेबाराच्या सुमारास चिंचवड अजंठानगर येथील टी.सी.आय.कंपनीजवळ घडली.

याप्रकरणी ट्रकचालक जीवन भगवान साळवे (वय ३१) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार रात्री पावणेबाराच्या सुमारास चिंचवड अजंठानगर येथील टी.सी.आय.कंपनीजवळून फिर्यादी जीवन आणि त्यांचे सहकारी तुषार पवार हे दोघे त्याच्या माल वाहक ट्रकमध्ये माल भरुन चालले होते. यावेळी एका दुचाकीवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी त्याचा ट्रक आडवला आणि कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या जवळी रोख १६ हजार रुपये जबरदस्ती चोरुन नेले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.