चिंचवड येथे ‘कलासंगम सोहळा २०१८’चे रविवारी आयोजन

23

कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त कलारंग कला संस्था व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१५) चिंचवड, येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी ५ वाजता ‘कलासंगम सोहळा २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील १५० हून अधिक कलाकारांचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती कलासंस्था व संस्कार भारतीचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली.

याबाबत माहिती देण्यासाठी पिंपरीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी दिनेश मारणे, सुमित काटकर, सुप्रिया धाईंजे, संकेत लोंढे, आशा नेगी, सरोज राव उपस्थित होते.

यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आयुक्त श्रावण हर्डीकर, संस्कार भारतीचे सतीश कुलकर्णी, प्रसिद्ध कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, तेजश्री अडिगे, महापालिकेचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे, गीता शर्मा, संदीप जाधव, रवींद्र गांगुर्डे आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी राजन लाखे, सतीश वर्तक, नंदकिशोर कपोते, तेजश्री अडिगे, प्रवीण तुपे, संजय कांबळे, दत्तोबा पाचंगे, डॉ. सतीश गोरे, किरण येवलेकर, राज आहेरराव, वैशाली पळसुले, देवदत्त कशाळीकर आणि नाना शिवले, बाळ जुवाटकर यांचा गौरव केला जाणार आहे.