चिंचवड येथून दुचाकीस्वार चोरट्यांनी वृध्देच्या गळ्यातील लाखाची मोहनमाळ केली लंपास

168

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – सुन आणि नातींसोबत पायी चालेल्या एका ६७ वर्षीय वृध्देच्या गळ्यातील १ लाख ५ हजार रुपये किमतीची ३५ ग्रॅम वजनी सोन्याची मोहनमाळ दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी हिसका मारुन चोरुन नेली. ही घटना सोमवार (दि.१३) रात्री पावणेनऊच्या सुमारास चिंचवड संभाजीनगर येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली.

याप्रकरणी वृध्देने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास ६७ वर्षीय वृध्द महिला या सुन आणि नातींसोबत चिंचवड संभाजीनगर येथील सार्वजनिक रस्त्यावरुन पायी चालल्या होत्या. यावेळी मागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी वृध्देच्या गळ्यातील १ लाख ५ हजार रुपये किमतीची ३५ ग्रॅम वजनी सोन्याची मोहनमाळ हिसका मारुन चोरुन नेली. निगडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.