चिंचवड येथील ताराबाई मुथा महाविद्यालयात ‘राखी बनविणे कार्यशाळा’ उत्साहात

186

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – चिंचवड येथील ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधन सणानिमित्त ‘राखी बनविणे कार्यशाळा’ व राखी विक्री प्रकल्प’  घेण्यात आला. यावेळी राखी विक्री प्रकल्पास विद्यार्थीनींचा उदंड प्रतिसाद मिळाला.

संस्थेचे सचिव राजेंद्रकुमार मुथा व सहाय्यक सचिव अनिलकुमार कांकरिया यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्यार्थीनीकडून राख्या बनवून घेण्यात आल्या. तसेच विविध कलागुणांबरोबर व्यवहारज्ञान ही मिळावे, यासाठी राखी विक्री प्रकल्प घेण्यात आला.

प्राचार्या श्रध्दा जैन यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक सुभाष देवकाते यांनी सुचना दिल्या. या कार्यशाळेचे नियोजन सुवर्णा भुजबळ, पल्लवी दुसाने यांनी केले. राखी विक्री प्रकल्पाचे नियोजन अर्चना भोर व स्वाती बोरा यांनी केले.