चिंचवड येथील आकाश लांडगे खून प्रकरणी मुख्य सुत्रधारास अटक

8152

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – चिंचवड येथील चापेकर चौकात रायबा उर्फ आकाश लांडगे या २४ वर्षीय तरुणावर ३० मे रोजी कोयता, रॉड आणि कुंडीने वार करुन चारजणांच्या टोळी गंभीर जखमी केले होते. ३१ मे ला आकाश याचा वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गुन्ह्यातील तीन आरोपी स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे, प्रफुल्ल ढोकणे, सोन्या वराडे यांना पोलिसांनी या पूर्वीच अटक केली आहे.

मात्र गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार सराईत आरोपी रणजित बाबू चव्हाण (वय २३, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) हा चार महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. मात्र चिंचवड पोलिसांनी मोठ्या शिताफीने रणजितला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित हा आकाश लांडगे खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार होता. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात एकूण १६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. तो शहरातील चिंचवड, निगडी, वाकड, वडगाव मावळ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये फरार होता. चिंचवड पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून रणजित हा आरसोली, ता. भूम, जि. उस्मानाबाद येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यावर चिंचवड पोलिसांनी एक पथक तयार करून आरसोली येथे पाठवले. तेथे त्यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने रणजित याला अटक केली. तर मयत आकाश देखील एक सराईत गुन्हेगार होता त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३९५,४२७  प्रमाणे गुन्हा दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार जगताप, पोलीस नाईक आखाडे, शेलार, शिरसाठ, पोलीस शिपाई डोके, आंबटवार यांच्या पथकाने केली.