चिंचवड मोहननगर परिसरात वाहनांची तोडफोड

100

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – शहरातील चिंचवड मोहनगर परिसरातील विविध ठिकाणी सात ते आठ वाहनांची टोळक्यांनी तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवार (दि.१२) रात्रीच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी चिंचवड मोहननगर परिसरात हातात कोयते घेऊन आरडाओरड करत विविध ठिकाणी उभ्या असलेल्या सात ते आठ वाहनांची तोडफोड करुन मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघाजणांना ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.