चिंचवड मध्ये दीड हजार लिटर गावठी दारू जप्त

0
69

गुंडा विरोधी पथकाची कामगीरी

चिंचवड,दि. 08 (पीसीबी)

दळवीनगर, चिंचवड येथे गुंडा विरोधी पथकाने कारवाई करत 1440 लिटर गावठी दारू जप्त केली. ही कारवाई सोमवारी (दि. 7) दुपारी एक वाजता केली.

कुणाल नवनाथ चव्हाण (वय 35, रा. आनंदनगर वसाहत चिंचवड पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार विजय गंभीरे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार विजय गंभीरे यांना माहिती मिळाली की चिंचवड परिसरातील दळवीनगर येथे दारू वाहतूक करणारे एक वाहन येणार आहे. त्यानुसार गुंडा विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक जगताप, पोलीस अंमलदार चव्हाण, मेदगे, वेळापुरे यांनी सापळा लावून कारवाई केली. पोलिसांनी संशयित जीपची तपासणी केली असता त्यामध्ये 1440 लिटर गावठी दारू आढळून आली. गावठी दारूसह बोलेरो जीप असा एकूण पाच लाख 94 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.