चिंचवड पोलीस ठाण्यात मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा

734

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – रस्त्यात दारु पिल्याच्या आरोपा खाली ताब्यात घेण्यात आलेल्या दोन मद्यधुंद तरुणींनी चिंचवड पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ शहर परिसरात चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांशी हुज्जत घालून आरेरावी केल्याने दोघींवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

स्मिता किशोर बाविस्कर (वय २२, रा. ओटास्कीम, निगडी), प्रिया प्रदीप पाटील (वय ३०, रा. पाटील नगर, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या दोन तरुणींची नावे आहेत.

चिंचवड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२९) रात्री रस्त्यात दारु पिल्याच्या आरोपाखाली स्मिता आणि प्रिया या दोन तरुणींना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी दोन्ही तरुणींनी मद्यधुंद अवस्थेत चिंचवड पोलिस ठाण्यात पोलिसांशी हुज्जत घालून धिंगाणा घातला. या दोघींना अटक करण्यात आली आहे. त्यांना फराजखाना येथे ठेवण्यात आले असून आज (गुरुवार) त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान या दोन्ही तरुणींनी दारु पिली नाही असा दावा केल्याचे व्हीडीओ मध्ये दिसत आहे.