चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या

673

देहुरोड, दि. २७ (पीसीबी) – मानसिक तनावातून मानसिक आजाराने ग्रासलेल्या चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरी फळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आली.

जयंत कृष्णराव कसबे (वय ५०, रा. देहूरोड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबे मागील दहा वर्षांपासून मानसिक तनावात असून ते मानसिक आजाराशी झुंजत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मानसिक आजाराचा जास्तच त्रास होऊ लागल्याने त्यांनी कामावरून सुट्टी घेतली होती. शनिवारी (दि. २५) रात्री घरच्यांसोबत जेवण करून ते झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. सकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना उठवण्यासाठी नातेवाईक त्यांच्या खोलीत गेले असता छताच्या पंख्याला त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत तातडीने देहुरोड पोलिसांना माहिती देण्यात आली. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.