चिंचवड आणि निगडीत शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक

113

पिंपरी दि. १५ (पीसीबी) – चिंचवड येथे गुंडा विरोधी पथकाने तर निगडी येथे शस्त्र विरोधी पथकाने कारवाई करून तिघांना अटक केली. तिघांकडून तीन कोयते जप्त केले आहेत.

सोहेल इस्माईल शेख (वय 21, रा. चिंचवड) याला गुंडा विरोधी पथकाने शनिवारी (दि. 14) दुपारी साडेचार वाजता वाल्हेकरवाडी येथून अटक केली. त्याच्याकडून 200 रुपये किमतीचा एक कोयता जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मयूर दळवी यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आकाश गौतम शिंदे (वय 24, रा. चिकन चौक, निगडी), शंकर ब्रह्मदेव शिंदे (वय 29, रा. ओटास्कीम, निगडी) या दोघांना शस्त्र विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. 13) रात्री सातच्या सुमारास मिलिंदनगर निगडी येथून अटक केली. याप्रकरणी पोलीस शिपाई मोहसीन युनूस अत्तार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.