चिंचवडमध्ये १४ ते २१ जुन दरम्यान मोफत योग शिबीराचे आयोजन

109

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – समता भ्रातृ मंडळ, कामगार कल्याण भवन आणि आरोग्य धनसंपदा योग वर्ग यांच्या संयुक्त विद्यामाने योग दिनानिमित्त चिंचवडमधील संभाजीनगर परिसरातील सुबोध विद्यालय समोरील कामगार कल्याण भवन येथे १४ ते २१ जुन यादरम्यान पिंपरी – चिंचवडकरांसाठी मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर पहाटे ५ ते ७ या वेळेत होणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील मुले, मुली, युवा, तरूण महीला, पुरूष, वयस्कर तसेच सेवानिवृत्त नागरिकांना या शिबीराचा लाभ घेता येणार आहे. तसेच यावेळी योगा, प्राणायाम, ध्यान-धारणा मोफत वर्ग आदींचा समावेश करण्यात आला आहे.