चिंचवडमध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांसह पावणेसहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

84

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – बंद घराचे लॅच तोडून घरातील लाकडी कपाटात ठेवेलेले १२७.५ ग्रॅम सोने, हिऱ्याचे दागिने आणि महत्वाची कागदपत्रे असा एकूण ५ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवार (दि.१३) ते मंगळवार (दि.१४) पहाटे चारच्या दरम्यान चिंचवड काळभोरनगर येथील फ्लॅट क्र. ४, ई बिल्डींग सुर्योदय कॉम्पलेक्स, आरती को. ऑप सोसायटी येथे घडली.

याप्रकरणी रत्नकांत शिवराम भोसले (वय ५९, रा. फ्लॅट क्र. ४, ई बिल्डींग सुर्योदय कॉम्पलेक्स, आरती को. ऑप सोसायटी, काळभोरनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले यांचा फ्लॅट सोमवार (दि.१३) ते मंगळवार (दि.१४) पहाटे चारच्या दरम्यान कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॅच तोडून बेडरुममधील लाकडी कपाटात ठेवेलेले १२७.५ ग्रॅम सोने, हिऱ्याचे दागिने तसेच अधार कार्ड, पॅनकार्ड, आर्मी कॅन्टीन कार्ड असा एकूण ५ लाख ८९ हजारांचा ऐवज चोरुन नेला. पिंपरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.