सुनेला दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडून तीच्यावर वारंवार छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कुलथे कुटूंबियांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विवाहित तरुणीने (दि.४ एप्रिला) ला दुपारी तीनच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सायली कुणाल कुलथे (वय २५, रा. संकल्प कुणाल पार्कच्या पाटीमागे, केशवनगर, चिंचवडगाव) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तीचे वडिल शरद दहिवाळ (वय ५४, रा. सयोगनगर, बिड) यांनी सायलीचा पती कुणाल कुलथे (वय २७, रा. संकल्प कुणाल पार्कच्या पाटीमागे, केशवनगर, चिंचवडगाव) आणि त्याच्या कुटूंबियांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद दहिवाळ यांची मुलगी सायली हिचे कुणाल कुलथे याच्या सोबत चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. ती आपल्या पतीसोबत चिंचवड येथील संकल्प कुणाल पार्कच्या पाटीमागे, केशवनगर येथे आपल्या सासरी कुलथे कुटूंबियांसोबत राहत होती. यावेळी तीचा पती कुणाल याच्या सोबत सासरे दोन ननंद, यांनी आपसात संगणमत करुन किरकोळ कारणावरुन तीला टोचून बोलून, संश्य घेवून, तसेच तीला दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडून, तीला शिवीगाळ करायचे तसेच तीला मारहाण देखील करायचे या त्यांच्या त्रासाला कंटाळून सायलीने आत्महत्या केली आहे, अशी तक्रार सायलीचे वडिल  शरद दहिवाळ यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि.५) चिंचवड पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल होता. मात्र सायलीच्या वडिलांनी वरिल तक्रार दिल्याने खळबड उडाली आहे. याप्रकरणी कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.