चिंचवडमध्ये संगणक अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

732

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – एका संगणक अभियंत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास चिंचवडच्या बिजलीनगर येथून उघडकीस आली.

अभिजित रामदास मुळे (वय ३८, रा. गिरीराज सोसायटी, बिजलीनगर चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या या अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत हे त्यांच्या लहान भाऊ आणि पत्नीसोबत चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये राहत होते. आज (शुक्रवार) सकाळी त्यांनी राहत्या घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ते हिंजवडी येथील टी.सी.एस या कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होते. आत्महत्येचे कारण अद्याप समजूशकलेले नाही. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.