चिंचवडमध्ये शेजाऱ्यासोबत झालेल्या भांडणानंतर व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू

259

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – पैशांच्या देवाण घेवाणीतून शेजायासोबत झालेल्या वादानंतर एका दुध व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथे घडली.

संतोष बहिरवडे (वय ४०, रा.चिंचवड ) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संतोष हा दुध व्यवसायीक होता. त्यांचे आज सकाळी शेजारील अजय पवार याच्यासोबत पैशांच्या देवाण घेवाणीतून वाद  झाला होता. मागील काही दिवसांपासून सतत हा वाद सुरु असल्याचे मयत संतोष यांच्या पत्नीने सांगितले आहे. या भांडणाच्या काही वेळानंतर संतोषचा संशयास्पद मृत्यू झाला. संतोषच्या पत्नीने मारहाण झाली असल्याचा आरोप केला आहे. मात्र संतोषच्या अंगावर मराहाणीचे व्रण आढळले नाहीत. संतोषचा मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.