चिंचवडमध्ये शिक्षक परिषद शहर कार्यकारिणीची सभा उत्साहात

139

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पिपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची सभा चिंचवडगाव येथे नुकतीच संपन्न् झाली.

या सभेत सभासद नोंदणी अभियान राबवणे, शिक्षकांच्या समस्या सोडवणे, वेगवेगळे आंदोलन कार्यक्रम, शिक्षक परिषदेचा विस्तार करणे, अजीवन सभासद नोंदणी करणे, मेळावे, योजना, आदर्श शिक्षक कार्यक्रम आदी विषयाबाबत आयोजन आणि नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी शहर कार्यकारिणीचे अध्यक्ष सुभाष देवकाते, उपाध्यक्ष गंगाधर शिरसाट, सहकार्यवाह संतोषकुमार सुरवसे, महिला आघाडी प्रमुख शमा शिकलगार, शोभा कोकरे, सहकोषाध्यक्ष सुभाष सांगळे, संघटनमंत्री राडेंद्र पितळीया आदी उपस्थित होते.

सभेचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह अंगद गरड यांनी केले. तर सुभाष देवकाते यांनी आभार मानले.