चिंचवडमध्ये लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

162

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) –  चिंचवड ते आकुर्डीदरम्यान बिजलीनगर येथे लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

मयत महिलेचे वय अंदाजे ५० वर्ष असून वर्ण गोरा, चेहरा-उभट, अंगात गुलाबी रंगाची सलवार, पिवळ्या रंगाचा पायजमा आहे. या वर्णनाच्या महिलेस कोणी ओळख असल्यास त्यांनी त्वरीत चिंचवड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.