चिंचवडमध्ये महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी पिता पुत्राला अटक

99

पिता पुत्राने मिळून एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना चिंचवड येथे बुधवारी (दि. ११)  रात्री आठच्या सुमारास घडली.

 सागर शितोळे आणि सुदाम शितोळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पिता पुत्राची नावे आहेत. याप्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ३० वर्षीय महिला आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून फिर्यादी महिला बुधवारी आरोपींच्या घराजवळ आली असता सागर आणि सुदाम या दोघा पितापूत्राने मिळून महिलेला जबर मारहाण केली. तसेच महिलेच्या अंगावरील कपडे फाडून तिचा विनयभंग केला. त्यावर पितापुत्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन चिंचवड पोलीसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.