चिंचवडमध्ये बनावट गॅस रेग्युलेटर लिक झाल्याने घराला आग; दोन महिला जखमी

187

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – गॅस सिलेंडरला बनावट रेग्युलेटर वापरल्याने गॅस गळती होऊन घराला आग लागली. यामध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना आज (रविवारी) सकाळी अकराच्या सुमारास चिंचवड येथील इंदिरानगरमध्ये घडली.

लक्ष्मी विलास धोतरे (वय ३५) आणि संगित गणेश पवार (वय २७) असे जखमी महिलांची नावे आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. आणि जखमी लक्ष्मी आणि संगिता या दोघींना उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले.