चिंचवडमध्ये पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकवणारा अटक; ७ मोबाईल फोन हस्तगत

505

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसाकावून पसार होणाऱ्या चोरट्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५३ हजार किंमतीची सात मोबाईल हस्तगत केली आहेत.

इमरान रहीम शेख (वय १८, रा. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगावातील सार्वजनिक शौचालयासमोरून जाणाऱ्या पादचाऱ्याचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावल्याची घटना घडली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.

त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना मोरया हौसिंग सोसायचीसमोरून ताब्यात घेतले. त्यातील एकजण अल्पवयीन आहे. त्याच्यांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अनेक पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावल्याचे कबूल केले. त्यांच्या घरातून चोरीचे वेगवेगळ्या कंपनीचे ५२ हजार किंमतीचे ७ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.