चिंचवडमध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जनजागृतीपर पालखी सोहळा

103

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – प्लास्टिकचा वापर बंद करा… कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी … प्रदूषण कमी तर आरोग्याची हमी … सुरवात आपल्या पासून करू, आपला परिसर स्वच्छ करू …. ओला सुका कचरा वेगळा करा, पर्यावरणाला मदत करा … स्वछतेचे ठेवा भान, आपला देश करू महान … असा संदेश देत चिंचवड गावातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढीवारीच्या निमित्ताने जनजागृतीपर अभिनव पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बालचमूंनी विठ्ठल-रूख्मिनी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्कताई आदी संताच्या वेशभूषा केल्या होत्या. ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करीत न्यू इंगलिश स्कूल, चापेकर चौक, गांधी पेठ मार्गे ही दिंडी काढली. यावेळी विविध पारंपरिक खेळाचे सादरीकरण करत पालखीतील सहभागी विद्यार्थ्यानी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालखीचे संयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निळकंठ चिंचवडे, कार्यवाहक सुनील चिंचवडे, प्राचार्य एस खेडकर, योगिता बनकर आदींनी केले.