चिंचवडमध्ये डांबर मशीनला मागून धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

91

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – पुढून चालेल्या एका डांबर मशीनच्या गाडीला दुचाकीस्वाराने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि.१२) रात्री सव्वानऊच्या सुमारास चिंचवड येथील काळभोरनगर ग्रेडसेपरेटर रस्त्यावर घडली.

परशुराम घनशाम वर्मा (वय ५८, रा. साईसिम्रन पार्क, पिंपरी) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा मनिष परशुराम वर्मा (वय ३४, रा. साईसिम्रन पार्क, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डांबर मशीनचालक सिध्दराम अमरप्पा इक्कळकी (वय ५०, रा. लांडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) याला अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिष याचे वडिल परशुराम वर्मा हे मंगळवार (दि.१२) रात्री सव्वानऊच्या सुमारास चिंचवड येथील काळभोरनगर ग्रेडसेपरेटर रस्त्यावरुन त्याची दुचाकी (क्र. एमएच/१२/बीके/७७४३) वरुन जात होते. यावेळी ग्रेड सेपरेटरमध्ये वाहन थांबवण्यास मनाई असताना समोरुन जाणाऱ्या डांबर मशीनच्या चालकाने डांबर मशीनची गाडी अचानक थांबवली. यावर मागून आपल्या दुचाकीवरुन आलेले परशुराम यांची दुचाकी आदळली. यामध्ये परशुराम यांच्या तोंडाला, डोक्याला आणि छातीला जबर मार लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डांबर मशीनचालक सिध्दराम याला अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.