चिंचवडमध्ये टोळक्यांकडून तरुणावर कोयत्याने वार

1487

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टोळक्यांनी तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना सोमवार (दि.३०) सायंकाळी पाचच्या सुमारास चिंचवड येथील दळवीनगर वसाहतमध्ये घडली.

आकाश कसबे (वय २३, रा. दळवीनगर वसाहत, चिंचवड) असे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सात जणांविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चिंचवड येथील दळवीनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या आकाश कसबे या तरुणावर पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टोळक्यांनी हल्ला केला. आकाशला सुरुवातीला लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या डोक्यावर आणि उजव्या हातावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.