चिंचवडमध्ये घरासमोर लावलेली कार चोरट्यांनी केली लंपास

548

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – घरासमोर लॉक करुन लावलेली एक इनोव्हा कंपनीची दहा लाख रुपये किमतीची कार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. ही घटना सोमवार (दि.३) रात्रीच्या सुमारास चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी तौसिफ आरिफ अन्सारी (रा. चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तौसिफ अन्सारी हे चिंचवड येथे राहतात. सोमवारी रात्री त्यांनी त्यांची टोयोटा कंपनीची इनोव्हा कार (क्र.एमएच/१४/सीएक्स/८७९३) घरा शेजारी लॉक करुन लावली होती. यावेळी रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांनी ती कार चोरुन नेली. निगडी पोलिस तपास करत आहेत.