चिंचवडमध्ये घरगुती कारणातून चुलत भावाकडून गळा दाबून बहिणीचा खून

171

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – घरगुती कारणातून चुलत भावाने गळा दाबून बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथील दळवीनगर येथे घडली आहे. ही घटना आज ( शनिवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  

ऋतुजा भोंडवे ( रा. दळवीनगर, चिंचवड) असे खून झालेल्या बहिणीचे नाव आहे. तर संतोष रोहिदास भोंडवे ( वय २५, रा. रावेत) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा ही संतोष याची चुलत बहीण आहे. त्यांच्यामध्ये  घरगुती कारणातून वाद सुरू होते. आज संतोष हा ऋतुजा हिच्या घरी आला होता. यावेळी त्याने ऋतुजा हिचा गळा दाबून खून केला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी सांगितले.