चिंचवडमध्ये क्रांतीदिनानिमित्त चापेकर बंधुच्या पुतळ्यास अभिवादन

160

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त  भारतीस स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या क्रांतिवीर हुतात्मा चापेकर बंधूंच्या चिंचवड गावातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे, कार्याध्यक्ष गोपाल बिरारी, जिल्हा सरचिटणीस किरण गांधी, शहर संघटक सुभाष मालुसरे, प्रमोद नेवे, साठे, ओमकार भोसले, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य संजय कुलकर्णी, गतीराम भोईर, अशोक पारखी आदी उपस्थित होते.