चिंचवडमध्ये औषधे व्यवसायातील डिलिव्हरी बॉइज’ला १० लाखाचा मोफत विमा

90

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – गेल्या कित्येक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात औषधे व्यवसायात महत्वाचा वाटा असणारे म्हणजेच “डिलिव्हरी बॉइज” ह्या संघटनेतील काम करणाऱ्या सुमारे १०० कामगारांना १० लाख रुपयांचा अपघाती विमा मोफत देण्यात आला. हा कार्यक्रम आज (सोमवारी) चिंचवडमधील संस्कृती हॉटेल पार पडला.

औषध व्यावसायात होलशेल (ठोक) कडून रिटेलकडे (किरकोळ) वेळेत औषधे पोहचविण्याच्या काम हे कामगार करतात. विशेष म्हणजे ही संघटना पिंपरी चिंचवडकरांना वेळेत औषधे पोहचविण्याचे काम करते.

परंतू, कसेबसे घर सांभाळणे एवढेच उत्पन्न कमावणारे हे कामगार दुचाकीवर रोज वाहतूक करत असतात. रोज औषधे घेऊन दुचाकीवरून प्रवास कधी घाई गडबड,धावपळ ,ही रोजचीच त्यामुळे अपघाताची वेळ कधी येईल सांगू शकत नाही. त्यामुळे यांचा अपघाती विमा असणे खूप महत्वाचे आहे. याच दृष्टीकोनातून सुमारे १०० कामगारांचा विमा मोफत काढण्यात आला.

यावेळी संघटनेचे संस्थापक शशीकांत माने, दिपक भांगे, संतोष खिंवसरा, महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, विशाल बुरट, महेश धोका, संतोष गदिया, उमेश बरडीया, सुरेंद्र बेदमूथा, अतुल लोढा, स्वप्नील बोकरिया, निंबील शहा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष गदिया यांनी केले. तर दिपक भांगे यांनी आभार मानले.