चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

124

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – चिंचवडमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करुन तसेच विविध गोष्टींचे आमिष दाखून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

राज असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत आरोपी राज याने सुरुवातीला मैत्री केली. त्यानंतर विविध गोष्टींचे आमिष दाखवून तीच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. यामुळे पिडीत मुलगी गरोदर राहिली आणि हा प्रकार उघडकीस आला. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.