चिंचवडमधील मोफत महाआरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

90

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – भाजपा युवा मोर्चा, कर्तव्य फाउंडेशन, चैतन्य मेडिको आणि स्टार हॉस्पीटल आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यामाने चिंचवडमधील ईशान हॉस्पिटलम येथे पिंपरी–चिंचवडकरांसाठी मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात आले. महाराष्ट्र राज्य लेखा समिती सदस्य अॅड. सचिन पटवर्धन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचा १६० नागरीकांनी लाभ घेतला.

यात हृदय, किडनी, मेंदू, मणका, अस्थीरोग, पोटाचे विकार, डोळे, महिलांचे अंतर्गत विकार, कर्क रोग, किमोथेरोपी, मधुमेह (शुगर), बीपी, छाती, आदी आजारांवर तज्ञ डॉकटरांनी समुपदेशन करून मोफत औषधे देण्यात आली.

यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष तथा नगरसेवक रवि लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष संतोष खिंवसरा, महावितरण समिती सदस्य भारती विनोदे, प्रभाग समिती स्विकृत सदस्य विठ्ठल भोईर, देविदास पाटील, बिभीषण चौधरी, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष, राजेंद्र चिंचवडे, भाजपा शहर पदाधिकारी पाटीलबुवा चिंचवडे, कांता मोंढे, संजीवनी पांडे, रवींद्र देशपांडे, नंदू भोगले, राज दरेकर, सिद्धू लोणी, सुनील कुलकर्णी, अजय भोसले, सत्पाल गोयल, प्रवीण मुथा, सुजित आरुडे आदी उपस्थित होते.