चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील चंदणाच्या झाडांची चोरी

201

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथून चोरट्यांनी चंदणाचे झाडे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २७) रात्री साडेबारा ते पहाटे पाचच्या सुमारास घडला.

या प्रकरणी दत्तात्रय मारूती आढले (वय ५२, रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमलोक पार्क येथे चंदणाची झाडे होती. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चार चंदणाची झाडे चोरून नेली. त्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.